मराठा मोर्चात सहभागी होऊ नकोस म्हणून माझ्यावर शिवसेनेनं दबाव आणला होता- हर्षवर्धन जाधव

Foto

औरंगाबाद- उदयसिंह राजपूत यांच्या शिवसेनेत घरवापसीच्या मुद्यावर प्रतिक्रिया देताना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपण शिवसेना का सोडली याच्यावर देखील प्रकाश टाकला जाधव म्हणाले की शिवसेनेच्या वरिष्ठांकडून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलू नकोस म्हणून माझ्यावर दबाव आणल्या गेला होता. मी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलू नये म्हणून मला वारंवार संगितले गेले.

 

कन्नड विधानसभा मतदार संघात हर्षवर्धन जाधव यांना शह देता यावा म्हणून शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी विविध प्रकारे कंबर कसली असून जाधव यांच्या विरोधात तुल्यबळ समजले जाणारे शिवसेनेतून राष्टवादीत गेलेले उदयसिंह राजपूत यांची आज ( रविवारी ) घरवापसी खासदार खैरे यांच्या पुढाकाराने झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना आमदार जाधव यांनी आपण शिवसेना का सोडली यावर देखील प्रकाश टाकला. जी शिवसेना आणि खैरे मला शह देण्याचा विचार करतात याच शिवसेनेनं मराठा आरक्षणावर मी माझे मत मांडू नये, मी मराठा मोर्चाला समर्थन करू नये म्हणून माझ्यावर वारंवार दबाव आणला मी माझ्याच समाजाच्या कामाला येत नसेल आणि तेही शिवसेनेच्या दबावामुळे तर मी हे सहन करू शकत नव्हतो. त्यामुळे मी शिवसेना सोडली असल्याचे आमदार जाधव यांनी सांजवार्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker